लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील एका तरूणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्या प्रकरणातील दोन आरोपींना लोहारा न्यायालयाने 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली  आहे. लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील दिलीप साहेबराव शिंदे (वय 23) या तरूणाचा अनैतिकसंबधाच्या कारणावरून मंगळवारी दि.17 डिसेंबर रोजी रात्री गळा चिरून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचे गावात तीव्र पडसाद उमटले होते.
संतप्त जमावाने सास्तूर पोलिस चौकीला घेरावा घालून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान ग्रामस्थांनी गावबंद करून रास्ता रोको आंदोलन कले होते. लोहारा पोलिसानी तत्परता दाखवत खुनातील मुख्य संशियीत आरोपी खदीर शेख व त्याचा साथीदार उस्मान केळगावे यांना अटक केली. परंतु यातील तीसरा अन्य एक आरोपी मात्र फरार झाला. अटक करण्यात आलेल्या दोन संशियत आरोपींना पोलिसांनी दि. 19 डिसेंबर रोजी लोहारा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.गळा चिरून हत्या केल्या प्रकरणातील दोन आरोपींना लोहारा न्यायालयाने 23 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली  आहे.
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील दिलीप साहेबराव शिंदे (वय 23) या तरूणाचा अनैतिकसंबधाच्या कारणावरून मंगळवारी दि.17 डिसेंबर रोजी रात्री गळा चिरून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचे गावात तीव्र पडसाद उमटले होते. संतप्त जमावाने सास्तूर पोलिस चौकीला घेरावा घालून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान ग्रामस्थांनी गावबंद करून रास्ता रोको आंदोलन कले होते. लोहारा पोलिसानी तत्परता दाखवत खुनातील मुख्य संशियीत आरोपी खदीर शेख व त्याचा साथीदार उस्मान केळगावे यांना अटक केली. परंतु यातील तीसरा अन्य एक आरोपी मात्र फरार झाला. अटक करण्यात आलेल्या दोन संशियत आरोपींना पोलिसांनी दि. 19 डिसेंबर रोजी लोहारा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे
 
Top