उस्मानाबाद /प्रतिनिधी-
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे मेडसिंगा ता.उस्मानाबाद येथे दि.27 नोव्हेंबर पासून सुरू झाले होते. त्याचा आज दि.3डिसेंबर रोजी समारोप संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या डॉ.सुलभा देशमुख (कॉलेज ऑफ एज्युकेशन उस्मानाबाद) शिबीरार्थींना मार्गदर्शन करतांना म्हाणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजनेतूनच विद्याथ्र्यांना व्यक्तीमत्वाचे धडे मिळतात आणि त्यातूनच त्यांची प्रगती होते.येथे स्वयंसेवकांना मान्यवरांची व्याख्याने ऐकायला मिळतात व श्रमदानाचे धडे मिळतात तसेच स्वालंबी जीवन कसे जगावे हे ही शिकवले जाते यामुळे एन.एस.एस.मध्ये सामाजिक बांधीलकी ठेऊन काम केल्यास विद्याथ्र्यांचा मेंदू,मन मनगट बळकट होते व त्याला सामाजिक मूल्ये प्राप्त होतात.भविष्यातही आपण विद्यार्थ्यांनी समाजसेवेचे वृत्त घेऊन आपल्या परिसरात स्वच्छता करण्याचे त्यांनी आवाहन केले.यावेळी त्यांनी मी एन.एस.एस.मधून कसे प्राचार्य पदापर्येंत पोहचले याचा इतिहास सांगितला.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी संस्थेचे संस्थापक डॉ.बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन केले. आध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,विद्याथ्र्याना कामाची व श्रमाची प्रतिष्ठा काय आहे ?हे कळण्यासाठीच राष्ट्रीय सेवा योजना आहे.आशा शिबीरातून श्रमदान करताना श्रमाचे महत्व कळते व यातूनच विद्याथ्र्यांना नेतृत्वगुण व वक्तृत्व गुण मिळतात व पुढे हेच विद्यार्थी विविध क्षेञात चांगले नेतृत्व देतात.यावेळी शाळेचे सुंदर मैदान बनवल्याबद्दल व वनराई बंधारे बांधल्याबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक केले.सदर सात दिवसाच्या शिबीरात शिबीरार्थींनी आपल्या श्रमदानातून मेडसिंगा गावात ग्रामसफाई अभियान राबवतांना गावातील रस्त्याची साफसपाई,गटार स्वच्छता,मंदिरापुढील सफाई,पानवट्याची सफाई.जि.प.शाळा परिसरातील स्वच्छता करतानांच शाळेसमोरील मैदानात तेथील विद्याथ्र्यांसाठी खो.खो.व लांबऊडी,कब्बडी मैदान लाल मातीचे करून दिले आहे.तसेच दोन वनराई बंधारे बांधले आहेत. गावात 17 शोषखड्डे घेतले आहेत.तसेच ग्राम सर्वेक्षन करून गावातील शिक्षण व नोकरीचे,वृक्षाची,जनावरांची ,संख्या गोळा केली आहे.
श्रमदानाबरोबरच शिबीरार्थी व ग्रामस्थांचे वैचारिक प्रबोधन होण्यासाठी सदर शिबीरात समृध्दी दिवाने (बी.डी.ओ.पं.स.उस्मानाबाद) सहाय्यक बी.डी.ओ मा.तायडे साहेब,गणेश माळी(तहसिलदार,उस्मानाबाद) बेडके साहेब(सामाजिक वनीकरण विभाग उस्मानाबाद), मुस्ताफ खोंदे (नायब तहसिलदार उस्मानाबाद), भाग्यश्री बिले (जिल्हा क्रक्रीडा अधिकारी उस्मानाबाद) या शासकीय अधिकारी यांची व्याख्याने संपन्न झाली.त्यातून शिबीरार्थींना वैचारिक माहिती व ज्ञान मिळाले. यातूनच विद्याथ्र्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास होणार आहे.श्रमदानातून गावचा विकास या शिबीरात करतांना प्रकल्प अधिकारी प्रा.श्रीराम नागरगोजे,प्रकल्पअधिकारी प्रा.माधव उगीले,प्रा.सौ.स्वाती बैनवाड, प्रा.मोहन राठोड (प्रकल्पअधिकारी) सरपंच सौ.संगिता आगळे, उपसरपंच सुधीर पाटील,ग्रामसेविका कुलकर्णी मॅडम, दत्ता बाबा आगळे,नितीन राऊत (ग्रामपंचायत सदस्य), प्रा.डॉ.एस.एस.फुलसागरप्रा.सौ.डोळे मॅडम, प्रा.नगरे, जि.प.शा.चे मुख्याध्यापक कुलकर्णी सर व त्यांचे शिक्षक, शुक्राचार्य शेलार यांचे सहकार्य मिळाले.
आजच्या समारोपा प्रसंगी ग्रामस्थाकडून शिबीरार्थींचे कौतुक करण्यात येत होते.गावातील ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारोपा प्रसंगी कांही निवडक शिबीरार्थी व कांही ग्रामस्थांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.माधव उगीले यांनी केले.प्रास्ताविक प्रा.श्रीराम नागरगोजे यांनी केले.आभार प्रा.शिवाजी गायकवाड यांनी मानले.