उस्मानाबाद/प्रतिनिधी -
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय स्पर्धांमध्ये दिव्यांग विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य दाखवणार आहेत. जिल्ह्यातील विविध संवर्गातील 26 शाळांतील एक हजार पेक्षाही अधिक स्पर्धक यामध्ये सहभागी झाले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील व जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध विभागातील अधिका-यांची उपस्थिती होती.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अनुदानित, विना अनुदानित व कायमस्वरूपी विनाअनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशाळामधील दिव्यांग मुला-मुलींना क्रक्रीडा क्षेत्रात चमकण्याची संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतुने मंगळवारी व बुधवारी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांधील न्यूनगंड दूर होऊन जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन विकसीत होण्यास याचा उपयोग होणार आहे. स्पर्धेतील सामने श्री तुळजाभवानी स्टेडियम येथे होत आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी पाटील होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकर, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य अंजली शेरखाने, सक्षणा सलगर, रत्नमाला टेकाळे, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, साधना कांबळे, सुभाष शिंदे, संस्थाचालक भारत सरवदे, शहाजी चव्हाण, भायगुडे, बालाजी शिंदे, रफीक कोतवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी तर सूत्रसंचालन जगदीश सुरवसे यांनी करुन बालाजी नादरगे यांनी आभार मानले.
 
Top