
काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा भेदक तोफखाना निष्प्रभ करण्यासाठी विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी जिल्ह्याचे भूमिपुत्र जेष्ठ नेते आ.सुजितसिंह ठाकूर नावाची भाजपामध्ये जोरदार चर्चा आहे.सभागृहामध्ये विवीध विषायावर गाजवणारे आणि समोरच्या बाकावरील सदस्यांची बोलती बंद करणारे हे नेते आहेत.त्यामुळे आ.सुजितसिंह ठाकूर यांची या पदावर निवड होण्याची शक्यता आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते म्हणून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांना त्यांनी धारेवर धरले होते. आता त्यांच्या प्रमाणेच आपलाही विरोधी पक्षनेता सशक्त असावा,असे भाजपला वाटत आहे.पण तीस वर्षांपासून सोबत असलेला शिवसेना हा जुना मित्र आता सत्ताधारी बाकावर असल्यामुळे भाजपची अडचण झाली आहे.
शिवसेनेचे कायदेतज्ज्ञ अनिल परब, आक्रमक नेते रामदास कदम आणि दिवाकर रावते यांच्यासह काँग्रेसचे भाई जगताप, प्रा. जनार्दन चांदुरकर, शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, तर राष्ट्रवादीचे हेमंत टकले, विद्या चव्हाण तसेच 20 वर्षांपासून सभागृहात असलेले शेकापचे जयंत पाटील आणि लोकभारतीचे कपिल पाटील यांच्यासारखा तोफखाना आहे. यांच्यामध्ये विरोधकांना गप्प करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या सर्वांना वेसन घालणारा सदस्य म्हणजे सध्या भाजपच्या भात्यात असणारे आ.सुजीतसिंह ठाकूर आहेत. पक्षनिष्ठेचा क्रक्रायटेरिया बाजूला ठेवल्यास प्रवीण दरेकर, सुरेश धस यांचीही नावे चर्चेत असली तरी सत्ताधारी पक्षांना काबूत ठेवण्यावर भाजपने लक्ष दिले आहे.