उस्मानाबाद / प्रतिनिधी- बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्यावतीने गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज घेऊ इच्छिणार्‍या नागरिकांसाठी एका विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आज 19 डिसेंबर रोजी उस्मानाबाद येथे ‘महाएक्सपो 2019’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. 
बँक ऑफ महाराष्ट्रच्या अभियानात सोलापूर विभागातील सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व 55 शाखा सहभागी होणार आहेत. अर्जदारांना कागदपत्रे छाननीनंतर त्यांना किती कर्ज मिळू शकेल हे सांगताना कागदपत्रे योग्य व पूर्ण असल्यास मंजुरीही दिली जाणार आहे. होटगी रोडवरील उजनी कॉलनी शाखा आणि जुळे सोलापुरातील जुळे सोलापूर शाखा आणि उस्मानाबाद शहरातील आनंदनगर शाखा या ठिकाणी गुरूवार, 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत एक विशेष दालन उघडले जाणार आहे. या अभियानाचा कर्ज घेऊ इच्छीणार्‍या खातेदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रिटेल सेलचे प्रमुख मलय करमाकर आणि उपझोनल व्यवस्थापक हेमंत महाजन यांनी केले आहे.
 
Top