तुळजापूर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हा सेवानिवृत्त समन्वय समिती जिल्हाध्यक्ष पदी विठ्ठलराव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव डोंगरे यांनी नुकतेच  विठ्ठल सोनवणे यांना नियुक्त पञ दिले.  ही निवड सन 2020 ते 2022 या दोन वर्षाच्या कालावधी करता आहे. सेवानिवृत्त कर्मचारी (1995) समन्वय समिती ही निवड केली असुन या निवडीचे सर्वच स्तारातुन स्वागत होत आहे. या संघटनेशी एस टी कर्मचारी, एमएसईबी, साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी या संघटनेत आहेत.

 
Top