उस्मानाबाद / प्रतिनिधी-
देशात अल्पसंख्य मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्यामुळे अल्पसंख्यांक हक्क दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जमात-ए-इस्लामी हिंद या संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिका-यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याकांचे हित जपण्याच्या हेतूने राष्ट्रीय अल्पसंख्यांक दिन साजरा केला जातो. अल्पसंख्यांकाच्या हक्काचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्राने प्रस्तुत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्यांक नागरिकांना संस्कृती भाषा धर्म परंपरा याचे संवर्धन करता यावे. या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. परंतु, या दिनावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. जातीयवादी संघटना सरकारच्या प्रेरणेतून अल्पसंख्यांक समाजावर लव्हजिहाद, गोरक्षा, तीन तलाक, मॉब लिंचींग,   केंद्रातील भाजप सरकारने जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून मतांचे ध्रुवीकरण करून आपला हेतू साध्य करण्याकरता असंविधानिक, धर्मनिरपेक्षतेला तडा देणा-या धर्मावर आधारित नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 पास करून कहर केला आहे. यामुळे अशा जातीयवादी विधेयकाला विरोध करण्याच्या हेतूने दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन चालू ठेवले आहे. त्यांचा वाद दडपण्यासाठी पोलिसांमार्फत षडयंत्र रचले जात आहे. या सर्व प्रकारचा विरोध करण्यासाठी अल्पसंख्यांक हक्क दिनावर बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 
Top