कळंब/प्रतिनिधी-
महापुरुषांच्या जयंती उत्सवातुन समाजातील विकृती दुजाभाव नष्ट झाला पाहिजे,अशा थोर महापुरुषाची जयंती साजरी करताना त्यांचे विचार व अचार समाजा समाजात पोहचविणे हि या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन खा.ओमराजे निंबाळकर यांनी केले.
उस्मानाबाद जिल्हा तेली समाज व कळंब तेली समाज शाखेच्या वतीने शिवाजी चौक येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,कळंबचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे,उस्मानाबाद शिवसेना तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,कळंबचे शिवसेना शहरप्रमुख प्रदिप मेटे,राजाभाऊ मुंडे,उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,कोषाध्यक्ष महादेव मेंगले यांच्या उपस्थितीत पुजन करण्यात आले.
पुढे बोलताना खासदार ओमराजे म्हणाले की, लहान वयोगटातील मुलांवर चांगले संस्कार त्यांना वाचनाची आवड निर्माण करणे पूर्वजांचे विचार त्यांना आत्मसाद करून देणे अशा जयंती उत्सवातुन सुरूवात करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमात खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.कैलास घाडगे पाटील,नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे ,माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, शिवसेना कळंब शहराध्यक्ष प्रदिप मेटे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,राजाभाऊ मुंडे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश शेवते, दत्ता शेवडे,गोकुळ बरकसे,भागवत कीरवे, अशोक चिंचकर,संदिप शेवते,अमोल गुरूसनाळे, विजय देशमाने, राहुल चालक, महेश दळवी, कोंडाप्पा कोरे महादेव मेंगले, लक्ष्मण फल्ले आदींची उपस्थिती होती. आभार जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी मांडले.या कार्यक्रमास विशंभर किरवे, वैजिनाथ देशमाने,काशिनाथ चिंचकर,स्वप्निल बरकसे,बाळकृष्ण गुरूसनाळे,कैलास बागल,किरण फल्ले,नानासाहेब लोखंडे यांच्यासह कळंब शहरातील व परिसरातील नागरिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोकुळ बरकसे यांनी केले