उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 भगवान श्री गुरूदेव दत्तात्रेय महाराज जन्मोत्सव निमित्त सप्ताह सोहळ्यात शनिवारी (दि.७) खा.ओमराजे निंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी आरती-पूजन करून दर्शन घेतले.
शहरातील शांतिनिकेतन कॉलनीतील श्री दत्तगुरू नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त सप्ताह सोहळा साजरा केला जात आहे. सप्ताहाच्या तिस-या दिवशीचे आरती-पूजन खा.राजेनिंबाळकर व आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रणदिवे परिवाराच्या वतीने धनंजय रणदिवे यांनी खा. ओमराजे व आ. पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, प्रसिध्दीप्रमुख रवि कोरे, पंकज पाटील, श्री. साळुंके आदी उपस्थित होते. शुक्रवारी (दि.७) गांधीनगर येथील मुक्ताई मंडळ  तर शनिवारी (दि.८) पोस्ट कॉलनी येथील गजानन महाराज मंडळाची बहारदार भजनसेवा संपन्न झाली. दोन्ही मंडळाचा सत्कार सौ.अंजलीदेवी रणदिवे यांनी केला.

 
Top