उस्मानाबाद /प्रतिनिधी-
राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रक्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि.7) करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर विभागाच्या मुलांच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तर मुलींमध्ये अमरावती विभागाने पहिला क्रक्रमांक मिळविला. क्रक्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रक्रीडा परिषदेच्या वतीने ही स्पर्धा शहरातील भारत विद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्पर्धेत मुलांचा संघ प्रथम क्रक्रमांक कोल्हापूर विभाग, द्वितीय नाशिक विभाग, तृतीय पुणे विभाग तर मुलींच्या संघामध्ये प्रथम अमरावती विभाग, द्वितीय मुंबई विभाग, तृतीय क्रक्रमांक नागपूर विभागाने मिळविला. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे, तर प्रमुख पाहुणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, शिवछत्रपती राज्य क्रक्रीडा पुरस्कारार्थी डॉ.चंद्रजित जाधव, राजसिंहा राजेनिंबाळकर, तांत्रिक समितीचे सदस्य गणेश राऊत, संभाजी गायकवाड, वैशाली मेश्राम, क्रक्रीडा अधिकारी सारिका काळे, अशोक बनसोडे, शैलेंद्र माने, राजेश बिलकुले आदी मान्यवर उपस्थित होते. मनोज सानप म्हणाले, खेळाडूंनी निरोगी आरोग्यासाठी सदैव खेळत राहावे, खेळाच्या माध्यमातून राज्याचेच नव्हे तर देशाचे नाव सातत्याने उज्ज्वल करावे, यासाठी मेहनत, सराव करीत राहावा. जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे यांनी स्पर्धेतील यश-अपयश खेळाडू खिलाडू वृत्तीने स्वीकारतो. त्यामुळे त्याला जीवनात येणारे यश-अपयश हाताळण्याची सवय होते. म्हणून खेळाडू हा निश्चितपणे जीवनातील सर्वच क्षेत्रात यशस्वी होतो, असे सांगितले. स्पर्धेतील प्रावीण्यप्राप्त संघातील खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन करून त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले तर आभार क्रक्रीडा अधिकारी कैलास लटके यांनी मानले.