उमरगा/प्रतिनिधी-
भारतीय माजी सैनिक संघटना उमरगा शाखेच्यावतीने प्रतिवर्षी शहीद झालेल्या वीर जवानांचे स्मरण म्हणून उमरगा-लोहारा तालुक्य तील वीरमाता, पिता, वीर पत्नी व विधवांचा सन्मान व मार्गदर्शन मेळावा घेण्यात येतो. यंदा ही आयोजन करण्यात आले असून बुधवारी (दि 04) शहरातील कस्तुरबाई मंगल कार्यालयात जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे.
भारतीय माजी सैनिक संघटनेच्यावतीने वीरमाता, पिता, वीर पत्नी, माजी सैनिक विधवांचा यथोचित सन्मान व माजी सैनिक स्नेह मेळावा व मार्गदर्शन बुधवारी शहरातील कस्तुरबाई मंगल कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्या त आला आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे या अध्यक्षस्थानी असणार असून आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन होणार आहे. यावे ळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस फिरासत, पोलिस उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले, उमरगा तहसीलदार संजय पवार, माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष गोपाळ वानखेडे, राज्य सचिव एम जी बिल्लेवार, पोलिस निरीक्षक माधव गुंडिले, कॅप्टन जलादी मेहता, डॉ आर डी शेंडगे उपस्थित राहणार आहेत. उमरगा-लोहारा तालुक्यातील वीरमाता, पिता, विधवा, माजी सैनिक आणि नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य यांनी केले आहे.
 
Top