उमरगा/प्रतिनिधी-
हैद्राबाद येथील डॉ प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करुन जिवंत जाळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तालुका जिजाऊ ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परीषदेच्यावतीने सोमवारी (दि.02) पोलिस निरीक्षक यांना निवेदन देवून आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
पोलिस निरिक्षक माधवराव गुंडिले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हैद्राबाद येथील डॉ प्रियांका रेड्डी यांच्यावर अत्याचार करुन जिवंत जाळून मारणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असून सदर घटनेतील सर्व आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी.देशात दिवसेंदिवस महिला अन युवतींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. डॉ रेड्डी यांच्यावरील घटना मनाला सुन्न करणारी असून अशा घटना जर समाजात घडू लागल्या तर मुली व महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे. देशात मुली व महिला सुरक्षित नसतील तर असे गुन्हे सर्रासपणे घडू लागतील अशा घटनावर जरब बसवायची असल्यास आरोपीला तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्षा सारीका अंबुरे, जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, जिल्हा उपाध्यक्षा सुनंदा माने, तालुकाध्यक्ष रेखाताई पवार, वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष किरण गायकवाड,जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, लखन भोंडवे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रदीप भोसले, जिजाऊ ब्रिगेड तालुका सचिव मंजुषा चव्हाण,माजी सचिव मीराताई चव्हाण, भक्ती आष्टे, ज्योतीताई कावळे, वैशाली आष्टे, राऊ भोसले, कल्पना कांबळे, रंजना जाधव, सरोजा सूर्यवंशी, सोनल पट्टेदार, रोहीणी बनसोडे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.