उमरगा/ प्रतिनिधी-
शिवाई हॉस्पिटलच्यावतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी जागतिक दमा दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.08) मोफत दमा तपासणी, उपचार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.८   डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत दमा तपासणी उपचार आणि मार्गदर्शन शिबीर या वेळेत संपन्न होणार आहे. या शिबीरात  दमा आजारावर माहिती, मोफत मार्गदर्शन पुस्तकाचे वाटप व ५०० रुपयात केली जाणारी अद्ययावत दमा चाचणी मोफत करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी औरंगाबाद येथील डॉ सुहास बर्दापूरकर, शिवाई हॉस्पिटलचे हृदय रोग व अस्थमा तंज्ञ डॉ. विजय बेडदुर्गे हे दमा रोगाविषयी असलेले समज गैरसमज यावर मार्गदर्शन, मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. परिसरातील नागरिक व गरजूंनी शिवाई हॉस्पिटल येथे नाव नोंदणी करून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिवाई हॉस्पिटल च्यावतीने करण्यात आले आहे.

 
Top