उस्मानाबाद/प्रतिनिधी-
इंग्लड येथे झालेल्या फुटबॉल लीगमध्ये शहरातील पृथ्वीराज चेडे या युवकाने उल्लेखनीय कामगिरी करीत नावलौकिक मिळवला आहे. पृथ्वीराज ने कर्णधारपद सांभाळत स्वत: चार गोल करून संघाला विजय मिळवून दिला. येथील शिवसेना नेते प्रशांत चेडे यांचा तो मुलगा असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
वाशी सारख्या ग्रामीण भागातील पृथ्वीराज ने इंग्लंड येथे झालेल्या फुटबॉल लीगमध्ये सहभाग नोंदवून कर्णधारपद सांभाळत संघाला विजय मिळवून दिला . या यशाबद्दल इंग्लंड येथील प्रसिद्ध फुटबॉलपटू ग्रॅंट ब्राउन यांनी पृथ्वीराज चेडे यास मानाची जर्सी भेट देत त्याचे कौतुक केले. या यशाबद्दल पृथ्वीराज चे शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत, शिवशक्ती सहकारी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पंडितराव चेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुणरावजी देशमुख, वडील प्रशांत चेडे, आई प्रियंका चेंडे, नगराध्यक्ष नितीन चेडे, उपनगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी, अण्णासाहेब देशमुख, भैरवनाथ शुगर वक्र्सचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींसह नागरिकांनी अभिनंदन केले.
पृथ्वीराज इंग्लंड येथील एफ.सी.व्ही या फुटबॉल अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत असून या अकॅडमीच्या संघाचे कर्णधारपद मागील दोन वर्षापासून भूषवत आहे. दरवर्षी इंग्लंड येथे होणा-्या 18 वर्षे वयोगटातील या फुटबॉल लीगमध्ये यांदा 40 फुटबॉल संघ सहभागी झाले होत. या स्पर्धा इंग्लंडमधील लिंकन शहरात पार पडल्या. अकॅडमीचा संघ क्युपीआर या संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये या संघाने सहा -दोन अशा प्रकाराने विजय मिळवला.