वाशी/प्रतिनिधी-
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामधून माणूस घडविला जातो. तसेच अनेक वक्ते निर्माण होतात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी गावाचा सर्वांगीण विकास करून देश उभारणीमध्ये हातभार लावावा. एकूण विकास प्रक्रीयेत ग्रामीण भागाचा मोठा वाटा असतो. मात्र, अनेकदा शहरी चौकटींच्या मर्यादेत अविभाज्य असणाऱ्या ग्रामीण परिसराच्या व्यथा अन् वेदना तरूणाईस समजत नाही. परिणामी, ग्रामीण आणि शहरी परिसरात शिक्षणामध्ये निर्माण होणारी दरी मोठी असते. हे चित्र बदलून ग्रामीण परिसराच्या समस्यांशी तरूणाईने एकरूप व्हायला हवे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जगदाळे यांनी केले.
श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचालित कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय जलसंवर्धन व ग्रामस्वच्छते विशेष युवक शिबीर  आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन मौजे तांदुळवाडी ता.वाशी येथे  प्राचार्य डॉ.सुर्यकांत जगदाळे  यांच्या उपस्थितीत व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शारदा मोळवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.सुर्यकांत आगलावे, केशव सावंत, सरपंच श्री.दत्तात्रय चौधरी, उपसरपंच सौ.गयाबाई माने, ग्रामसेवक श्री.विकास माळी,  काकासाहेब चौधरी, अॅड. प्रदीप देशमुख, भागवत चौधरी, श्री.प्रकाश चौधरी, नानासाहेब चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हैदराबाद येथील पीडित डॉ.प्रियंका रेड्डी यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रम अधिकारी प्रा.राजाभाऊ बनसोडे आणि स्वयंसेविका यांनी राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.शारदा मोळवणे यांनी अध्यक्षीय समारोप केला.  यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.विश्वास चौधरी, प्रा.राजेंद्र बनसोडे, प्रा,डॉ.बालाजी देवकते  यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा,डॉ.बालाजी देवकते, सुत्रसंचलन प्रा.विश्वास चौधरी तर आभार प्रा.राजेंद्र बनसोडे यांनी मानले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी  प्रा.राम जाधव, प्रा.डॉ.अनिल कट्टे, प्रा.डॉ.अरुण गंभिरे, प्रा.एम.डी उंदरे, प्रा.पांडुरंग तांबारे, प्रा.डॉ अभिमान माने, प्रा.राजेश उंदरे, प्रा.छाया नखाते, प्रा.डॉ.दैवशाला रसाळ, प्रा.उर्मिला नाईक, प्रा.सुनिता डोके, प्रा.चेतना जगताप, प्रा.प्रगती ठोंगे, प्रा.निलोफर शेख, प्रा.पल्लवी दळवे, प्रा.दिपाली कोल्हे, प्रा.अमृता चेडे, श्री.शिवाजी साळुंके, श्री.स्वप्निल शेळकंदे, श्री.चंद्रकांत घाडगे यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी सर्व  प्राध्यापक वृंद, ग्रामस्थ, स्वयंसेवक, स्वयंसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
 
Top