उमरगा/प्रतिनिधी-
भारतीय सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतात म्हणून देशातील जनता सुखाने नांदते आहे . भारतीय सैनिक माझे आदर्श असून त्यांची देशनिष्ठा व देशप्रेम अतुलनीय असते अत्यंत कठीण काळात व विविध प्रसंगी देश रक्षणासाठी प्राणांची आहुती देणा-या सैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो,अशा प्रसंगी कशाचीही तमा न बाळगता तो रात्रीचा दिवस करुन देशसेवा करीत असतो. सेवानिवृत्ती नंतर ही सैनिकांचा सन्मान केला पाहीजे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी केले .                                                            
उमरगा येथील कस्तुरबाई मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय माजी सैनिक संघटना आयोजित सस्नेह मेळावा व विशेष सत्कार सोहळा  शनिवार दि. 4 रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात  त्या बोलत होत्या. या वेळी प्रमुख उपस्थिती ,शेंडगे रिसर्च सेंटर तथा इम्पॅनल हॉस्पिटलचे डॉ.आर.डी.शेंडगे , भारतीय माजी सनिक संघटने राज्य सचिव  मुरलीधर बिलेवार,  कॅ. जलधी मेहता , आबाजी जाधव , एस.बी राजे , हनुमंत सरडे ,  वासुदेव कुलकर्णी आदी उपस्थित होते .
पुढे बोलताना सौ. उदमले पुढे म्हणाल्या की, माजी सैनिकांनी सामाजातील प्रत्येक घटकांशी  नाते निर्माण करुन एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.आरोग्याची काळजी घेत-घेत  कुटूंबही तंदुरुस्त राहीले पाहिजे.जो पर्यंत आपले कुटूंब आर्थिक दृष्टया स्वालंबी होणार नाही तो पर्यंत विकास अशक्य आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी अमर जवान स्तंभास अनुराधा उदमले यांच्यासह  सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून दिपप्रज्वलन करुन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य संचालक शहाजी चालुक्य यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी डॉ.शेंडगे,  बिल्लेवार यांनीही  मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले.या वेळी जिल्हाभरातून आलेल्या 126 वीरमाता,वीरपत्नी यांना साडीचोळी भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष  शहाजी चालुक्य यांनी केले.प्रकाश रणखांब,लक्ष्मण कलबुर्गे,बबुवान गायकवाड, अदिनाथ घोरफडे,विश्वंभर दासमे,अशोक सुर्यवंशी,काशीनाथ चौधरी,गोविंद काळे,माधव गायकवाड,शिवाजी सैदर्गे, खंडू दूधभाते,सुरेश सुर्यवंशी,जनार्धन सगर,फुलचंद दासिमे,शिवाजी वडदरे,बालवीर शिंदे,दिलीप माने,ज्ञानेश्वर पवार,मेहबुब चाकुरे,परमेश्वर चौगुले,व्यंकट चौधरी,काशीनाथ चिनगुंडे, सुरेश बेंडकाळे,विजयकुमार हिरेमठ,आबाजी जाधव आदींनी पुढाकार घेतला.या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.महेश मोटे तर आभार श्रीमंत चव्हाण यांनी मानले.राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
 
Top