लोहारा/प्रतिनिधी-

इंटरनेटच्या जमान्यामध्ये महिलांनी विविध अॅपचा वापर करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन बाल विकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केले.
उमरगा येथील समाज विकास संस्था व  महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात डिजिटल इंडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुवर्णा जाधव  बोलत होत्या. या कार्यक्राच्या अध्यक्षास्थानी विद्याताई वाघ होत्या तर प्रमुख म्हणुन पुणे येथील प्रणव पवार,  भूमिपुत्र वाघ,  सारिका लोढे, अदि उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  करण्यात आले. यावेळी प्रणव पवार यांनी मोबाईलच्या माध्यमातून विविध योजना  अपलोड कशा कराव्यात योजनेस लाभ कसा घ्यावा, सातबाराचा उतारा काडने, विविध योजनेच्या योजनेचे फॉर्म भरणे. स्कीमची माहिती अपलोड करणे पंतप्रधान योजना यांचा लाभ आपण घरी बसल्या बसल्या घेऊ शकतो, या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी भूमिपुत्र वाघ, सारिका लोढे, अदिंनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल वाघ यांनी केले  तर ज्योती राजपूत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेजर संजय लोढे, कृष्णा पाटिल, शालिनी पाटील, विद्या मारकड, छाया साळुके, गोदावरी पाटिल, अनिता शिरोळे, बानुबी शेख, उषा गाडेकर, रहिमा शेख, अदिंनी परिश्रम घेतले.

 
Top