उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय मुंबई यांच्या वतीने  मागासलेले जिल्ह्यात सुक्ष्म - लघु उद्योगास चालना देण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्याथ्र्याना प्रेरणा मिळावी यासाठी  चित्रकला व निबंध स्पर्धेचे इयत्ता नववी ते बारावी च्या विद्याथ्र्यांंसाठी इंटरप्राईजेस विकास आणि ब्रँड एम. एस .एम. ई. साठी पदोन्नतीसाठी पुरस्कार ही स्पर्धा घेण्यात आली.
 या स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार 10,000 रुपये द्वितीय 7,500 तृतीय 5, 000 रुपये रोख बक्षीस प्रमाणपत्र स्वरूप होते. स्पर्धेच्या सुरुवातीला प्रास्ताविकात धनंजय जोहरी निदेशक एम. एस .एम.ई. विकास संस्थान मुंबई यांनी स्पर्धेच्या विषयाचे महत्व सांगितले चित्रकला संबंधी कलाध्यापक शेषनाथ वाघ व गणेश पांचाळ यांनी सूचना सांगितल्या तसेच निबंध स्पर्धेच्या विषयी संतोष अवधूत यांनी सूचना केल्या. या स्पर्धेत निबंध 51 विद्यार्थी तर चित्रकला स्पर्धेत 75 विद्याथ्र्यानी सहभाग नोंदविला होता.
ही स्पर्धा स्काऊट गाईड सभागृह येथे घेण्यात आली. स्पर्धेच्या आयोजनासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक गजानन सुसर, विस्ताराधिकारी बालाजी  यमुलवाड, सहशिक्षक संतोष मुळे, गणेश पांचाळ ,सोपान पवार, एस. जी .बोरगे , एच.जी.जाधव,डी टी अंबुरे , एन.एन. मुळे, एन.पी. सावंत , श्रीमती सुषमा सांगळे यांनी परिश्रम घेतले. या चित्रकला स्पर्धेसाठी विद्याथ्र्यांना पेन्सिल, रबर ,रंगपेटी तसेच निबंध स्पर्धेसाठी कागद व पेन देण्यात आला तसेच स्पर्धा संपल्यानंतर विद्याथ्र्यांना खाऊ वाटप करण्यात आला. या स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी ने केले तर आभार शेषनाथ वाघ यांनी केले.

 
Top