तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तु संग्रहालयाच्या नविन ईमारतीच्या बाधकामाचे खोदकाम करताना प्राचीन विटाचे बांधकाम लागल्यामुळे  त्याठीकाणी उत्खनन केल्यावर सातवाहनकावीन गोलाकार विटाचे बांधकाम आढळून आले.
तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तु संग्रहालयास नविन ईमारत बांधकामासाठी 15 कोटी 68 लाख रूपये मंजूर झाले असून ईमारतीच्या बांधकामाचे खोदकाम चालु असताना प्राचीन विटाचे बांधकाम आढळून आल्याने त्याठीकाणचे खोदकाम बंद  करण्यात आले.याठीकाणी १८ डिसेंबरला संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षर अमोल गोटे यानी उत्खखननास सुरुवात केली असून याठीकाणी प्राचीन सातवाहनकालीन  अवशेष गोलाकार असल्याचे दिसून येत आहे.या बांधकामाच्या विटा 45से. मी.लांब,24 से.मि.रूंद तर 8 ते 9 से.मि.जाड असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. तर सातवाहनकालीन मातीचा सुपारीसारखा मनि मिळून आला आहे.

संग्रहालयाच्या ईमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करताना प्राचीन विटाचे बांधकाम दिसून आले असून सदर बांधकाम उत्खननात सातवाहनकालीन असून पूर्ण उत्खनन  झाल्यावरच नेमके काय आहे ते निश्चीत होईल
                                             अमोल गोटे,सहाय्यक अभिरक्षक,संग्रहालय,तेर
 
Top