तेर/प्रतिनीधी-उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सोयाबीन चोरीचा तपास करण्यात तेर दुरक्षेञचे बिट अम्मलदार प्रकाश राठोड यांना  यश आले. आले.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील अमोल गोरोबा काळे यांचे शेतातील पञ्याचे शेड उचकून 21 कट्टे सोयाबीन 19 डिसेंबरच्या राञी चोरीस गेले होते.याबाबत ढोकी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.या बाबतीत ढोकी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. एस.एस. बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तेर दुरक्षेञचे बिट अम्मलदार प्रकाश राठोड यानी तात्काळ याबाबतीत कसुन तपास करून दादा रामा काळे रा.उस्मानाबाद यांना ताब्यात घेताच त्यानी पिकामध्ये चोरलेले 14 कट्टे सोयाबिन दाखविले तसेच चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल क्रमांक एमएच25/ऐऐ 5181 ही पोलिसानी ताब्यात घेतलेली आहे.आरोपीला 20 ते 22 डीसेंबरपर्यत कस्टडीही देण्यात आली होती.सोयाबिन चोरीचा पर्दाफाश तेर दुरक्षेञचे बिट अम्मलदार प्रकाश राठोड यानी केल्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
 
Top