कळंब/प्रतिनिधी-
मुला-मुलींनी आपल्या दैनंदिन जीवनात एक चांगला नागरिक झाले पाहिजे, तसेच आपल्या शिक्षणाचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे असे आवाहन मुलांना मार्गदर्शन करताना योगीनिताई प्रभुदेसाई यांनी केले, त्या पर्याय संस्था कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बालहक्क मेळावा कार्यक्रमात बोलत होत्या.
 पुढे त्या म्हणाल्या की, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे, त्यामुळे प्रत्येकानी शिक्षण घेतले पाहिजे, एकशन एड व पर्याय संस्था हसेगाव (के) यांच्या संयुक्त विद्यमाने दी.22 डिसेंबर रोजी या बालहक्क मेळाव्याचे आयोजन कण्यात आले होते, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचे विविध पैलू या विषयावर पर्यायचे संचालक सुभाष तगारे यांनी मार्गदर्शन केले तर बालकांचे हक्क या विषयावर समन्वयक भिकाजी जाधव यांनी मार्गदर्शन केले, या वेळी मुलांनी अंधश्रद्धा निर्मुलन, हागणदारी मुक्त गाव, प्लास्टिक बंदी, ग्रामस्वचछता, बालविवाह, धूम्रपान आदी विषया वरती पथनाट्य सादर केले, मुलांचे विविध खेळ यावेळी घेण्यात आले.
 या मेळाव्याचे सूत्रसंचालन आशोक तोडकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास गोडगे, सुनंदा खराटे , प्रमिला राख, विकास कुदळे यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्यासाठी कळंब  व वाशी तालुक्यातील 105 मुल -मुली सहभागी झाले होते.

 
Top