उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 गावात विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या माध्यमातून गावात श्रमदान करून  गावाला सुंदर बनवावे,असे प्रतिपादन प्रा. राजा जगताप यांनी केले.
  व्ही.जे.शिंदे महिला महाविद्यालय उस्मानाबाद  यांच्या "राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे " सात दिवसाचे विशेष श्रम संस्कार शिबीर "निर्मल गाव व पर्यावरण संवर्धन"या थिमखाली मौजे दारफळ (ता.उस्मानाबाद) येथे संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन प्रा.राजा जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.शाळेचे हाके सर होते. यावेळी सरपंच सौ,बालिका गोवर्धन सुतार,उपसरपं सौ.ज्योती धर्मराज जाधव,हुकमत मुलाणी, प्रकल्पाधिकारी प्रा.विशाल मोरे, प्रा.शिवगोंडा पाटील,प्रा.विजया खुने,प्रा.पुजा हंगरगेकर,प्रा.अरविंद इंगळे उपस्थित होते. प्रारंभी  प्रमुख पाहुण्याच्या हस्ते साविञीबाई फुले व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. अध्यक्षीय समारोप  हाके सर यांनी केला. या शिबीरात शंभर विद्यार्थिनी सहभाग घेतला. सुञसंचालन प्रा.शिवगोंडा पाटील यांनी केले. यावेळी गावातील  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top