उस्मानाबाद/प्रतिनिधी-
वाळू माफीयाद्वारे अंगावर ट्रॅक्टर घालून गंभीर जखमी झालेले अनिल हेळकर यांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर हॉस्टिपटल येथे हलविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने त्वरीत अधिक उपचारासाठी २५ लाख रूपयाची मदत त्वरीत द्यावी, अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. वाळू माफीयाद्वारे अंगावर ट्रॅक्टर घालून गंभीर जखमी करण्याच्या घटनेचा निषेध म्हणून तहसीलदार, महसूल कर्मचारी व तलाटी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
१४ डिसेंबरच्या पहाटे सिनो नदीच्या पात्रातील वाळू उपसून निली जात असल्याची माहिती, परंडाच्या तहसीलदार अनिल हेळकर यांना मिळाली. माहिती मिळताच हेळकर आपल्या दोन ते तीन कर्मचा-यांसह घटनास्थळी भेट देवुन त्यांनी ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यास सांगितले. परंतू संबंधित ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तहसीलदार हेळकर यांनी ट्रॉक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता. त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात आला. यामध्ये हेळकर गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटनेचा निषेध करण्यासाठी तहसीलदार व नायबतहसीलदार संघटना, महसूल कर्मचारी संघठना व तलाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन १० मागण्या मांडण्यात आल्या आहेत.  या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना जलद गतीने न्यायालयात खटला दाखल करावा, कायद्यामध्ये दुरूस्ती करून महसूल प्रशासन पथकास पिस्तोल परवान्यासह उपलब्ध करून देण्यात यावे, वाळू तस्करीच्या दोन पेक्षा जास्त वेळेस कारवाई झालेल्या आरोपींना तडीपार करण्यात यावे, फिरत्या पथकास कारवाईसाठी स्वंसंरक्षणार्थ सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दुपार नंतर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

 
Top