उस्मानाबाद /प्रतिनिधी-
हाफ मॅरेथॉन स्पर्धेस नगर परिषदच्या वतीने संपुर्ण सहकार्य केल्याबद्दल स्पर्धेच्या संयोजकांनी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर व मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह भेट देऊन सत्कार केला.
यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी अनेक युवकांनी मिळून हाफ मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी केली आहे. त्याबद्दल न.प.च्या वतीने ही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षीच्या स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांनी शहरवासियांसह सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. पुढील वर्षीच्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी आजपासूनच तयारीला लागा असे त्यांनी आवाहन केले.

 
Top