तुळजापूर/प्रतिनिधी-
श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने भाविकांना  मंदीरात प्रवेश करण्यासाठी दिले जाणारे अँक्सेस पासेस वितरण  नव्या वर्षा पासुन बंद करण्याचा प्रस्ताव संस्थानचा विचारधीन असुन याला पर्याय म्हणून मंदीरात प्रवेश करण्यासाठी असणा-या महाध्दारावर मेटल डिटेक्टर बसवुन त्यावर उच्च दर्जाचे कँमेरे  बसवुन मंदीर सुरक्षा बाबतीत  दक्षता घेण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान मध्ये मागील दोन वर्षापासून अँक्सेस पासेस घेतल्यानंतर भाविकांना मंदीरात प्रवैश दिला जात होता माञ अँक्सेस पासेस यंञणा सातत्याने बंद पडू लागल्याने व भाविकांन साठि वेळखाऊ व ञासदायक ठरणारी असल्याने अखेर अँक्सेस पासेस वितरण नव्या वर्षा पासुन बंद करुन त्याऐवजी मंदीर प्रवेश महाध्दार वर मेटल डिटेक्टर बसवुन त्यावर उच्च दर्जाचे कँमेर बसवुन भाविकांना तपासणीअंती मंदीरात सोडणे व कँमेर असल्याने मंदीरात जाणा-्या भाविकांची संख्या मोजली जावुन त्यात आत जाणाऱ्यांचे फोटो ही स्पष्टपणे येणार असल्याने यामुळे सुरक्षाप्रश्न मार्गी लावून भाविकांना अँक्सेस पासेस काढण्यासाठी लागणारा वेळ वाचुन ञास कमी होणार आहे , अशी ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय अँनआँफिशल  बैठकीत घेण्यात आल्याचे समजत.े या बाबतीत 24डिसेबर 2019 रोजी होणा-या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच अभिषेक रांगेत च आता अभिषेक पासेस देण्या बाबतीत ही विचार झाल्याचे समजते, अँक्सेस पासेस वर फोटो स्पष्ट पणे येत नव्हते माञ बदललेली उपाययोजना कार्यान्वित केल्यास फोटो स्पष्ट येणार असुन यामुळे मंदीर सुरक्षामजबुत होणार आहे.

 
Top