परंडा/प्रतिनिधी-
शहरात अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.4) रात्री अर्धा ब्रास वाळूसह जप्त केला आहे.
शहरातील मंडई पेठेतील चौकात अवैध वाळूची वाहतूक करत असलेला ट्रॅक्टर नायब तहसीलदार डॉ. तुषार बोरकर, तलाठी विनोद चुकेवाड, तानाजी भोजने, पोलिस कर्मचाऱ्यांनी पकडला व ट्रॉलीतील अर्धा ब्रास वाळू जप्त केली. ट्रॅक्टर-ट्रॉली पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिली असून, शासकीय नियमानुसार दंड आकारणी होणार आहे. तालुक्यात वाळू घाटाचे लिलाव बंद असल्याने अवैध वाळू उपसा करणारी टोळी सक्रिय असून, रात्री विविध भागातील नदी पात्रात उत्खनन करुन वाळू काढली जाते व चोरुन विक्री केली जात असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती.