प्रतिनिधी / उस्मानाबाद-
तालुक्यातील पळसप फाटा येथे दुचाकीवरून निघालेल्या ऊसतोड मुकादम व त्याच्या पत्नीस अडवून चाकूचा धाक दाखवत लुटणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने चोवीस तासांत गजाआड केले.
तस्लीम लतीफ शेख (रा. कसबे तडवळे) हे ऊसतोड मुकादम पत्नी परवीनसह दि.3 डिसेंबरच्या रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून दगडेवाडी ते तडवळा रोडने जात होते. यावेळी पळसप फाटा येथे दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चौघांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील रोख 1 लाख 30 हजार रुपये व पत्नी परवीन यांच्या अंगावरील 47 हजाराचे दागिने असा एकूण 1 लाख 77 हजाराचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक डी. एम. शेख व उपनिरीक्षक पी. व्ही. माने यांनी तपास सुरू केला. यावेळी मिळालेल्या माहितीवरून एलसीबीने कारवाई करत घटनेतील दोन आरोपी कुक्या बादल शिंदे उर्फ मोतीराम व बेनाड्या तानाजी काळे उर्फ राजू यांना चोवीस तासांत गजाआड करत त्यांच्याकडून लुटीतील 76 हजार 300 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. अन्य दोघे फरार आहेत. ही कामगिरी पोलिस हवालदार जगताप, कवडे, पोलिस नाईक चव्हाण, गव्हाणे, पोलिस कॉन्स्टेबल सावंत, आरसेवाड, सरजे, मरलापल्ले यांच्या पथकाने केली आहे.