उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्याची बीपीएल यादी करताना त्यामध्ये सधन लोकांचा समावेश केला आहे. सदर यादीतुन सधन लोकांना वगळून विधवा व गरीब लोकांचा समावेश करण्याची मागणी, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय घोडके यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बीपीएल यादीची चौकशी करून धनदांडग्या लोकांची नावे वगळावी व गरीब, विधवा महिलांच्या नावाचा त्यामध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर बाळकृष्ण घायाळ, संतोष दुधभाते, सुरेश कोकरे, रवी बंडगर, शेखर खांडेकर आदींच्या सह्या आहेत.
 
Top