उस्मानाबाद/प्रतिनिधी - युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांनी विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात बेरोजगारी व सध्याच्या शिक्षणपद्धतीतील अमुलाग्र बदलासंदर्भात आग्रही भुमिका मांडली आहे.यासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले की,"युवकांसाठी बेरोजगारी हा मोठा गंभीर विषय झाला आहे. 2016 च्या अंताला जी नोटबंदी झाली त्यावर कोणीही बोलत नाही.तसेच विरोधी पक्षही यावर बोलायला घाबरतो.नोटबंदी झाल्यामुळे तसेच देशामध्ये चुकीच्या पद्धतीने जीएसटी आल्यामुळे उद्योगधंदे बंद झाले.ज्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली तसेच शेतकरी व शहरी भागाची वाट लागली.यावर मात करून सर्व गोष्टींना चालना द्यायची असेल तर विविध विषयांवर चर्चा करणे गरजेचे आहे."
त्याचबरोबर बेरोजगारीला जोडून शिक्षणा संदर्भात महत्त्वाचा विषय मांडताना ठाकरे म्हणाले की,"खरं तर या देशात आणि या महाराष्ट्रात केजी टू पीजी शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलाची गरज आहे.कारण आपण जे शिक्षण घेतो त्यासाठी पहिल्यांदा डोनेशन द्यावे लागते. बारा वर्ष शिक्षण घेऊन त्यानंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊनही नंतर नोकरी मिळणार की नाही याचा काहीही विश्वास नसतो.तेव्हा हे जर चित्र बदलायचे असेल तर शहरी भागातच नव्हे तर गावपातळीवरही शिक्षणपद्धतीत बदल करण्याची गरज आहे.मुंबई महानगरपालिकेच्या 1232 शाळांमध्ये 8 भाषांमध्ये शिक्षण दिले जाते जिथे 50 हजारावर विध्यार्थी Tab वर शिक्षण घेत आहेत.हे Tab चं शिक्षण आपण गावपातळीवर नेणे गरजेचे आहे.कारण 1232 शाळांमध्ये 500 शाळा व्हर्चुअल क्लासरुमने जोडलेल्या आहेत.तीच  satellite technology आपण गावपातळीवर नेली तर समान शिक्षण समान दर्जा प्रत्येक गावापर्यंत व जिल्ह्यापर्यंत जाऊ शकेल.यासाठी आपण मा.मुख्यमंत्री व सरकारच्या सर्व सदस्यांना विनंती करणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले."
युवकांच्या बेरोजगारी तसेच इतर प्रश्नांवर राज्याच्या सभागृहात या आगोदर कुणीही आवाज उठवत नसल्याची खंत कायम युवकांच्या मनामध्ये होती.ती आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून भरून येईल असे दिसत आहे.तेंव्हा युवकांचे प्रश्न सभागृहात मांडल्याबद्दल युवासेनेचे जिल्हा समन्वयक अॅड.संजय भोरे यांनी समस्त युवकांच्या वतीने आ.आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
 
Top