लोहारा/प्रतिनिधी-
मुलगा - मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान वागणूक देने ही काळाची गरज आहे. वाईट प्रसंग मुलींवरच ओढवतात असे नाही, तर मुलांवरही अनेक प्रकारचे लैंगिक अत्याचार होतात, त्यावेळी असा नकोसा अनुभव आलाच तर तो प्रसंग कसा हाताळायचा याचे शिक्षण मुले व मुली अशा दोघांनाही हवे असे, प्रतिपादन सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ व सह्याद्री फाऊंडेशन्सच्या सचिव डॉ. वसुधा दिग्गज दापके - देशमुख यांनी केले.
 लैंगिक अत्याचाराबाबत मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सह्याद्री फाऊंडेशन्सच्या तर्फे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इलियाज खान यांच्या सुचनेनुसार  गुड टच बँड टच हा उपक्रम महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील भातंबरे ता.बार्शी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रबोधनपर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए.जे. दळवी होते. तर प्रमुख म्हणुम मनिषा झोंबडे, निता माळी, अर्चना खुने, दिपाली मिंढे, रविराज राऊत आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक ए.एम.माळवदकर यांनी केले तर आभार राजेंद्र कापसे यांनी मानले.

 
Top