तुळजापूर/प्रतिनिधी-
महारष्ट्रची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पाठीमागच्या बाजूस शिवाजी दरवाजा,दगडी कमानी जवळ कच-यास सोमवार दि.16 रोजी राञी अचानक आग लागली. परंतू ही आग मंदीराच्या ंकट्रोल रुम मधील कर्मचा-यांना  सीसीटीव्ही मध्ये दिसताच मंदीरातील अग्नीशमन यंञणा तातडीने कार्यान्वित करुन वेळीच कच-यास लागलेली आग विझवल्याने मोठा अनर्थ टळुन अर्थिक  व जिवीतहानी टळली. यावेळी अनेक सुरक्षारक्षक सुरक्षा अधिकारी, स्वच्छता कर्मचारी स्वच्छता विभागातील अधिकारी या सर्वांनी आपल्या जीवाची बाजी लावत लागलेली आग विझवली.
श्रीतुळजाभवानी देवीमंदीराचा पाठीमागे असणा-या शिवाजी दरवाजा येथील दगडी कमान परिसरात असणा-या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात साठलेला कचरा पेटत असल्याचे राञी मंदीर कंट्रोल रुमच्या कर्मचा-यांना सीसीटीव्हीमध्ये दिसले ही आग वेगाने वाढत असल्याचे निर्दशनास येताच सुरक्षारक्षक व स्वच्छता कर्मचारी व सर्व अधिकारी वर्गाने आग विझवणारी यंञणा कार्यान्वित करुन  कमीत कमी वेळामध्ये ती आग विझवली त्यामुळे इतरञ पेटत जाणारी आग जागीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला. आग वरील बाजूने लागल्याने पुन्हा वाढण्याची शक्यता गृहीत धरुन सदरील कचरा खाली पर्यत पाणी टाकुन विझवला गेला. आग विझवण्याकामी सुरक्षा अधिकारी शाहूराज माने सचिन पवार अण्णा पलंगे,  अंकुश घुगे ,  विष्णू गायकवाड , विकास कुंभार, उमाप शिवाजी, सुरज नकाते युवराज फडके, श्रीकांत नन्नवरे तसेच समस्त फायर ब्रिगेड फायर फायटिंग चा केंद्रबिंदू मानला जाणारे तळमजला येथील सुरक्षा रक्षक योगेश फडके सह अनेक सुरक्षा रक्षक हेडगार्ड व इतर स्वच्छता कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top