तुळजापुर/प्रतिनिधी-
भवानी रोड वरील चँनेल गेट जवळुन कार कंट्रोल न झाल्याने सदरील कार भवानी रोडवरुन सुसाट वेगाने सुटलेली कार राजेशहाजी महाद्वारासमोर लोकांनी बाकडी टाकुन अडवल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात वृध्दासह कांही  जखमी झाल्याची घटना रविवार दि. 22 रोजी राञी 9.30 वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,  कार (क्रमांक एम एच 2५ए एल 2088) च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार वेगाने सुवर्णश्वर मंदिरासमोरून राजेशहाजी महाद्वार येथे गेली यावेळी सतर्क नागरिकांनी या कारच्या समोर बाकडी टाकून तीस अडविले. यामध्ये वृध्दांसह काही भाविक जखमी झाले आहे.

 
Top