उस्मानाबाद/प्रतिनिधी-
765 केव्ही  व 420 केव्हीच्या वीज वाहिन्या मुळे झालेल्या बाधित क्षेत्राबाबत योग्य प्रस्ताव  न देता व पंचनामे न करता शेतक-यांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तत्काळ बाधित क्षेत्राचे योग्य पंचनामे करून अहवाल जिल्हाधिका-यांकडे सादर करावा, अशी मागणी उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतक-यांनी केली आहे.
याबाबत शेतक-यांच्या वतीने पॉवरग्रीड कंपनीच्या अधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर अॅड.आशिष पाटील, दत्तात्रय गावसावे, सुखदेव सुरवसे, महादेव पाटील, भारत पाटील, रमेश सागुळे, गणेश गावसाने,   विष्णू मते ,नवनाथ मते आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top