तुळजापूर/प्रतिनिधी-
मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव जयंतराव धुरगुडे यांच्या जयंती निमित्ताने मंगळवार दि.31 डिसेंबर 2019 व बुधवार1 जानेवारी 2020 रोजी मराठवाडा विभागस्तरीय माध्यमिक शालेय विद्याथ्र्यांसाठी विविध स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.
यात धावणे लांब उडी गोळाफेक स्पर्धा व वक्तृत्व, मँरथान स्पर्धेचे आयोजन केले आहे विजेत्या स्पर्धकांनारोख रकमेचे पारितोषिक ट्राँफी व प्रमाणपञ देवुन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धा मंगळवार दि 31 व बुधवार दि.1 रोजी संपन्न होणार आहेत.  या स्पर्धसाठी मराठवाडयातील सर्व अधिकृत शाळांना प्रवेश खुला आहे. स्पर्धेत ओळखीसाठी शाळेचे प्रमाणीत केलेले प्रमाणापञ पञ आवश्यक आहे. विजेत्या स्पर्धकांना बुधवार दि.1 रोजी पंचायत समिती प्रागणांत मान्यवर पाहुण्यांचा हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठीची अधिक माहीती हवी असल्यास अरुण ढोकळे, खंडेराव किसवे यांच्या शी संपर्क साधावा. सदरील स्पर्धेसाठी 2९ डिसेंबर 2019 पुर्वी नोंदणी करुन मराठवाड्यातील जास्तीत जास्त शाळांनी व  विद्यार्थीनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन अध्यक्ष राजकुमार धुरगुडे यांनी केले आहे.
 
Top