दिल्ली पोलिसांचा कार्यवाहीचे अभाविपकडून समर्थन !
तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील टाटा सामाजिक संस्थेतील विद्याथ्र्यांना उस्मानाबाद व तुळजापूर येथे आंदोलन करण्यास परवानगी देवु नये,अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा शाखेने  पोलिस निरिक्षक  यांना निवेदन देवुन केली आहे.
निवेदनात म्हटलं आहे की, टाटा सामाजिक संस्थेतील काही विद्यार्थी आंदोलन करणार असल्याचे समजते दिल्ली येथील समाजकंटकावर पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे आम्ही समर्थन करतो. टाटा सामाजिक संस्थेचे विद्यार्थी जिल्हयात आंदोलन  करण्याचा तयारीत असुन त्यांचा मोर्चा आंदोलनामुळे  शांतता भंग होण्याची शक्यता आहे. सदरचे आंदोलन देशविरोधी आंदोलन असणार आहे. तरी शांतता टिकविण्यासाठी त्यांच्या आंदोलनाला परवानगी देवू नये असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर प्रतिक प्रयाग, गणेश अबुंलगे, किरण पाठक , पुरंजन कोंडो, अँड जनक पाठक,अँड गिरीश लोहारे,  रेणुकादास पाठक, रुषीकेश सांळुके, सचिन सुरवस, श्रीकांत कावरे, अलोक शिंदे, सुदर्शन वाघमारे, रोहन भांजी , आकाश धर्माधिकारी, योगेश मसारे, शुभम काळे,  सुजित साठे  आदी  अभाविप पदाधिकारींच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top