उस्मानाबाद/प्रतिनिधी-
येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनार साळुंखे यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव एड. मिलिंद पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष शेषाद्री डांगे डॉ. अभय शहापूरकर, रवींद्र साळुंखे आर्य चाणक्य विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनिष देशपांडे,सुषमा पाटील,शर्मिष्ठा डांगे, यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने साळुंखे परिवाराचा यथोचित असा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड.मिलिंद पाटील म्हणाले की, महाविद्यालयाच्या या यशामध्ये प्राचार्य डॉ.अनार साळुंखे यांचा सिंहाचा वाटा आहे, महाविद्यालयाला एका उंचीपर्यंत नेण्याचे काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मध्ये केलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाचे अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले गेले आहे. महाविद्यालयाने त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळया क्षेत्रांमध्ये यश मिळवले आहे असे गौरव उद्गार यावेळी अॅड. पाटील यांनी काढले. यावेळी शेषाद्री डांगे,डॉ. अभय शहापूरकर डॉ. मनिष देशपांडे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना डॉ.अनार साळुंखे म्हणाल्या की, आज पर्यंतच्या वाटचालीमध्ये संस्था तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे अपेक्षित असे काम मला या महाविद्यालयांमध्ये करता आले. यावेळी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी तसेच प्राध्यापक व कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.