उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 समाजाची सेवा करण्यासाठी तरुणांनी प्रशासनात यावे व समाजाची प्रामाणिकपणे सेवा करावी, विद्याथ्र्यांनी स्पर्धा  परीक्षेचा अभ्यास करतांना  परीक्षा काय आहे? प्रश्नांची गरज कोणती आहे? हे ओळखणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्याअगोदर अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर परीक्षांचे स्वरूप काय आहे ? हे देखील समजून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. पहिल्या प्रयत्नात जरी आपणाला यश मिळाले नाही तरी आपण प्रयत्न सोडून देऊ नये, प्रयत्न करणा-यांना यश मिळतेच म्हणून त्याचा नेहमी पाठलाग केला पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस उपअधिक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी केले.
रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा विभागाचे उद्घाटन दि.5 डिसेंबर रोजी, तुळजापूर येथील पोलीस उपअधिक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांचे हस्ते करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख होते.  डॉ ए. बी. इंदलकर यंानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रा. मारुती अभिमान लोंढे यांनी केले, आभार प्रा. मंगेश भोसले यांनी मांनले तर सूत्रसंचालन डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.संदीप देशमुख, प्रा.राजा जगताप, प्रा. एम.यु उगीले व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top