उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची बुधवारी (दि.4) उस्मानाबादेत बैठक पार पडली. यावेळी छगनराव भुजबळ यांची कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. तसेच संघटनेने करावयाची कामे, संघटनेच्या शाखांचा विस्तार, सामाजिक कार्य, वधु-वर मेळावे आयोजित करणे आदींबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
यावेळी संघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी नूतन पदाधिका-यांच्या निवडी जाहीर केल्या. यामध्ये माळी समाज महासंघ युवक प्रदेश कार्याध्यक्षपदी सोमनाथ राऊत (सांगोला), महाराष्ट्र माळी समाज महासंघ युवक प्रदेश सरचिटणीस मारुती रोकडे-तुळजापूर,महाराष्ट्र माळी समाज महासंघ उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर माळी- सरपंच तामलवाडी, युवा जिल्हाध्यक्षपदी अमर माळी-उस्मानाबाद, लोहारा तालुकाध्यक्ष-सोमनाथ भोजने- फनेपुर यांची निवड करण्यात आली. यावेळी महासंघाचे विश्वस्त दलितमित्र माधवराव हुंडेकर, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर, युवा प्रदेशाध्यक्ष अविनाश माळी, विभागीय अध्यक्ष अशोक माळी, झेडपी सदस्य श्रीहरी माळी, सरपंच नरसिंग खुणे, चंद्रशेखर सुरवसे, नारायण माळी, श्याम माळी, अमोल माळी, बाळासाहेब भाले यांच्यासह माळी समाजबांधव उपस्थित होते.
 
Top