उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कामगार मंडळ गट लातूर येथे 20 डिसेंबर रोजी गट स्तरीय बालनाट्य स्पर्धा पार पडल्या. यात छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तसेच वैयक्तिक अभियानामध्ये उत्कृष्ट अभिनेता,  उत्कृष्ट बाल अभिनेत्री , उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार देखील पटकावले.
या स्पर्धेत विद्यार्थी समाज प्रबोधनपर मोबाईल वेडा राजदरबार हे नाटक सादर केले होते. यात उत्कृष्ट अभिनेत्री स्वरांनी शाम नवले, गायत्री भागण्णा चिनगुंड, उत्कृष्ट बाल अभिनेता म्हणून मकरंद युवराज खंडागळे तर उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कलाध्यापक जी.एम पांचाळ  यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात अस्मिता कोळी, ईश्वरी भगत,आदित्य हावडे, ज्ञानेश्वरी कवडे , स्वराली शितोळे , गायत्री नागपुरे, वंदना माने, वनश्री राऊत, समृद्धी मराठी या कलाकारांनी देखील उत्कृष्ट भूमिका साकारली यशस्वी कलाकारांचे संस्था अध्यक्ष शशिकलाताई घोगरे, सचिव धनंजय पाटील, कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, मुख्याध्यापक आर. एस.देशमुख, मुख्याध्यापक पी.एन. पाटील,  पर्यवेक्षक एन.एम.देटे, कलाशिक्षक जी.एम.पांचाळ यांच्यासह शिक्षक कर्मचारी कौतुक केले.

 
Top