कळंब प्रतिनिधी-
तालुक्यातील डिकसळ ग्रामस्थांनी वारंवार विनंती निवेदन देवूनही अधिका-यांना घाम फुटला नाही. यामुळे महावितरणविरुद्ध सोमवारी (दि.23) सकाळी दहा वाजता कळंब-ढोकी रोडवरील चौकात टाळ मृदंगाच्या गजरात गावचा वीज प्रश्न सोडवण्यासाठी निष्क्रिय अधिका-यांच्या पायाचे पूजन करत बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशारा डिकसळ ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे महावितरण कार्यालयास दिला आहे.
अनेक महिन्यापासून मूळ डिकसळ गावात वीज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत कार्यालयाकडे सातत्याने ग्रामस्थांनी पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्यापही कार्यालयाकडून कुठलीच दखल घेतली गेली नाही. विशेष म्हणजे आजवर महावितरण कार्यलयातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना तीन ते चार वेळा लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप काम जैसे थे असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर उपसरपंच सचिन काळे, ग्रा.पं सदस्य जीव्हेश्वर कुचेकर, हभप आण्णासाहेब बोधले महाराज, विजय बोधले, सूर्यभान अंबिरकर, बळीराम कोल्हे, नरसिंग मगर, जनक अंबिरकर, पोपट अंबिरकर, युवराज बोधले, जयदीप बोधले, अशोक बोधले, श्रीमंत अंबिरकर, सुब्राव जाधव, गणेश दिक्षित, ओंकार काळे, रवी त्रिवेदी, कचरू अंबिरकर, पंडित अंबिरकर, हकीम पटेल, वैभव जाधव, उमाशंकर अंबिरकर, विशाल काळे, आदी शेकडो ग्रामस्थांच्या यावर स्वाक्ष-या आहेत.

 
Top