उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भाषणाचा उपयोग हा देशामधे जातीयवाद,धर्मांधता,अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नव्हे तर  समाजजागृतीची दिशा देण्यासाठी व देशाला एकसंघ ठेवण्यासाठीच झाला पाहीजे,असे मत राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष  प्रदीपदादा सोळुंके यांनी   उस्मानाबाद येथे केले.
 शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ते उद्घाटनप्रसंगी बोलत होते. सत्ता असताना तर अनेक जण विविध कार्यक्रम घेतात पण ही स्पर्धा सत्ता नसतानासुद्धा गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने घेतली जात असल्याबद्दल स्पर्धेचे आयोजक व वक्ता सेलचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके यांचे विशेष कौतुक  प्रदीपदादा सोळुंके यांनी भाषणात केले  कार्यक्रमाचे उद्घाटन श्री प्रदीपदादा सोळुंके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील हे होते.
विद्याथ्र्यांना समाजात विशिष्ट मान सन्मान मिळवायचा असेल व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रभावीपणे काम करायचे असेल तर वक्तृत्व कला अवगत असली पाहीजे असे प्रतिपादन डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर,प्राचार्य डॉ. जयसिंगरावजी देशमुख ,श्री नितीनजी बागल ,प्रा.संदीप देशमुख ,प्रा.सतीश मातने,प्रा.असीफ पठाण,विशाल पाटील,शंतनू खंदारे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक प्रा.सुशील शेळके , यांनी केले तर सूञसंचलन श्री.रणजीत दांगट यांनी केले. सदरील स्पर्धा शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामधे विवेकानंद सभागृहात  आयोजीत केली गेली होती. याप्रसंगी वक्ता सेलचे सर्व  सदस्य व  वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top