उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या मागील बाजू कुष्ठधामच्या बाजूला शासकीय जमिनीवर दि. 1 जुलै 2019 रोजी एक हजार रोपांची लागवड जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मिळून केली होती. आता ही झाडे ब-यापैकी वाढली आहेत. या झाडांच्या बुंध्याशी आळे करून तिथे निंदनीकरण, पाणी साठविण्यासाठी चर तयार करणे, आधीचे गवत काढून झाडांच्या मूळांवर माती टाकून त्यावर गवत टाकणे (मल्चिंग करणे) ही प्रक्रिया करण्यासाठी जल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, वनविभाग, व्हीएसटीएफ ची टिम अशा विविध कार्यालयांच्या अधिकारी-कर्मचा-यांनी मिळून  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी आंधळे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशीला देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद, क्षेत्रीय वन अधिकारी श्री. पवार, श्री. अमोल घोडके, नितीन व्हटकर, नायब तहसिलदार श्री. कुलकर्णी, संतोष पाटील, चेतन पाटील, पंकज मैंदाडे, महसूल संघटनेचे पदाधिकारी माधव मैंदवाड, प्रमोद चंदनशिवे, दीपक मुंडे, दीपक चिंतेवाड, रवी मोहिते, नाना मुंडे, श्रीमती शीतल माजलगावकर, सीमा वाघमारे, श्रीमती. शोभा गायकवाड, वैशाली कदम, तलाठी अर्चना कदम तसेच इतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे येथील परिसरात भविष्यात घनवनामुळे निसर्गरम्य ठिकाण निर्माण होणार आहे. तरी नागरिकांनीही या घनवनाच्या परिसराचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
Top