उमरगा/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी उमरगा तालुका नूतन तालुकाध्यक्ष पदी जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन कैलास (दादा)शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दि 29 डिसेंबर 2019 रोजी उमरगा शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटन पर्व 2019 ते 2022 ह्या संघटनात्मक कार्यासाठी निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून अनिल काळे ( प्रदेश कार्यकारणी सदस्य ) यंानी काम केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर आण्णा पाटील, ?ड खंडेराव चौरे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास आण्णा कोळगे, इंद्रजित देवकते, जिल्हा सरचिटणीस सतीश बप्पा देशमुख, संताजी चालुक्य, माधव पवार, सुनील कुलकर्णी, दिलीपसिंह गौतम, हंसराज गायकवाड, रमेश माने, नेताजी गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष पदांसाठी एकूण जवळपास 10 कैलास शिंदे, सिद्धेश्वर माने, सुनील कुलकर्णी दिलीपसिंह गौतम, प्रशांत माने, श्रीराम राठोड, लिंबराज सोमवंशी, ज्ञानेश्वर पाटील, महादेव सलके, श्रीराम डोंगरे यांनी अर्ज आले होते. या सर्व उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन सर्वानुमते कैलास शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी माधव पवार, सुनिल कुलकर्णी, संताजी चालुक्य, सुधिर आण्णा पाटील, अॅड खंडेराव चौरे, दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच नूतन तालुकाध्यक्ष श्री शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवड प्रक्रियेची माहिती श्री काळे यांनी दिली. सूत्रसंचलन सिद्धेश्वर माने यांनी केले तर आभार विठ्ठल चिकुंद्रे यांनी मानले. यावेळी शहरातील व तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.