परंडा / प्रतिनिधी -
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेत्तवाखालील  महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतक-यांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफी  दि 1 एफ्रील 2015 ते 31 स्पटेंबर 2019 प्रर्यंत जाहिर केली आहे . या निर्णयाच्या पुर्वीचे थकी बाकीदार शेतक-यांना देखील कर्जमाफी देण्यात यावी याबाबत शासणाने गांभीर्यान विचार करुन शेतक-यांना न्याय द्यावा असा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ थकबाकीदार शेतक-यांना होणार आहे .
 मात्र चालु बाकीत असलेले शेतकरी या कर्जमाफी पासुन वंचित राहु नये या शेतकऱ्यांना देखील कर्ज माफी मिळावी अशी मागणी परंडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिल शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे
 परंडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार दि.30 रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली .या बैठकीत शेतकरी सभासदाचा अडीअडचणी यावर चर्चा करण्यात आली. विचार संस्थेचे सभासद शेतकरी ज्यादा तर चालु बाकीत असुन ते प्रत्येक वर्षी नवे जुने कर्ज प्रकरण करतात त्यामुळे हे शेतकरी कर्जमाफी पासुन वंचित राहु नये असा ठराव संचालक मुजीब काझी यांनी मांडला त्यास सर्वनी सहमती दर्शवली चेअरमन अनिल शिंदे यांनी हा ठराव सर्वानुमते मंजुर झाल्याचे जाहिर करुन या ठरावाची राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्याबाबत सचिव मधुकर गायकवाड यांना सांगीतले
  या बैठकीस खलील पठाण , बुद्धीवान पाटील , मिठु लोकरे , महादेव गरदळे, बिस्मिलाबी अकिल जिनेरी , गंगुबाई राजेश गायकवाड , गोकुळ खैरे , हे संचालक उपस्थीत होते .

 
Top