लोहारा/प्रतिनिधी-
तुगाव येथे एका 14 वर्षीय दलित अल्पवयीन मुलीवर 3 जणांनी जिवे मारण्याची धमकी देवुन बलात्कार केला आहे. या घचनेचा निषेध करुन या आरोपींना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी लोहारा तालुका फकिरा ब्रिगेड यांच्यावतीने शहरातील शिवाजी चौकात दि.7 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि, दि.27 नोव्हेंबर रोजी सांयकाळी आठ वाजयाच्या सुमारास तुगाव येथे एका 14 वर्षिय अल्पवयीन मुलीला तिघांनी जिवे मारण्याची धमकी देवुन अमानुषपणे बलात्कार केला आहे. तरी शासनाने या क्रुर, अमानुष, समाजकंठकावर योग्य ती कडक कार्यवाही करुन फाशीची शिक्षा द्यावी, या पिडीत मुलीच्या घराचे पुर्नवसन करुन, शासकीय आर्थिक मदत देवुन, पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या रास्तारोको आंदोलनात फकिरा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्रीरंग सरवदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खंडाळे, युवक जिल्हाध्यक्ष शिवाजी मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब सरवदे, संजय गायकवाड, आकाश मिसाळ, प्रकाश गायकवाड, हाणमंत रोडगे, महादेव मिसाळ, बिभीषण ढोबळे, विनोद ढोबळे, बाळु ढोबळे, शहाजी वाघमारे, तय्यब खडीवाले, यांच्यासह तालुक्यातील फकिरा ब्रिगेड व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पो.नि.ए.ए.चौरे, पोलीस उपनिरीक्षक आनंद वाठोरे, पोलीस कर्मचारी पोपट क्षीरसागर, प्रविण नळेगावकर, मनोज जगताप, यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.