तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे महिला सबलीकरण विभागा‘या वतीने महिलांविषयक कायदे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी प्रा.डॉ.स्मिता कोल्हे, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे विधि महाविद्यालय ऊस्मानाबाद यांनी वरील प्रतिपादन केले.याप्रसंगी मान्यवरां‘या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ.कोल्हे पुढे म्हणाल्या की, हुंडा पद्धत ही आपल्या संस्कृतीवर असलेला कलंक आहे कायद्याने यावर निर्बंध असुन देखील समाजामध्ये जनजागृती झालेली नाही, आजमितीला आपल्या समाजात स्त्री सामाजिक, आर्थिकदृष्ट्या, पारिवारिक दृष्टीने सुध्दा सुरक्षीत नाही.महिलांनी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.स्त्रियांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.पाल्यांना परिवार या संकल्पनेची जोपर्यंत जाणिव होत नाहीत तोपर्यंत त्यां‘यावर वैवाहिक जबाबदारी देणे चुकीचे आहे, स्त्रीगर्भलिंग चिकित्सा ही बाब समाजासाठी अतिशय घातक आहे.समाजामध्ये शैक्षणिक समानतेची बिजारोपण होणे गरजेचे आहे, मुलिंनी आज आत्मसंरक्षसाठी योग्य प्रशिक्षण घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर म्हणाले की, कायद्याचे पालन करणारी व्यक्ती कधीही कोणत्याही प्रकार‘या अडचणीत सापडत नाही.जागतिकीकरणा‘या प्रक्रीयेत पैसा मोठा झाला पण माणूस लहान झाला.मुलिंना जन्मापासून मृत्यूपर्यंत संघर्ष असतो मुलिंनी स्वावलंबी व स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षणाची कास सोडू नये असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सबलीकरण विभागा‘या प्रमुख प्रा.ए.जी.पोटे यांनी केले,तसेच पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.सी.आर.दापके यांनी करवुन दिला.कु.भाग्यश्री चोपदार हिने यावेळी स्त्री समाजावर आधारित कविता यावेळी उपस्थितांना ऐकवली, कार्यक्रमाप्रसंगी प्रा.दैठणकर  एस.एस  प्रा.बोडके एस.एल  यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पुनम कुमेर व मुस्कान शेख या विद्यार्थ्यांनिंनी  केले  कार्यक्रमाचे आभार कु सय्यद मर्जिना या विद्याथ्र्यीनिने मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.मणेर यां‘या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top