उमरग/प्रतिनिधी-
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी नगर पालिकेच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी दि 6 रोजी तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळ पासून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली वाहिली.
सकाळी भारतीय बौद्ध महासभा,त्रिरत्न बौद्ध महासंघाचे वतीने बुद्ध पूजा घेण्यात आली.धम्ममित्र शाक्यदीप कांबळे, यांनी त्रिसरण घेतले.या वेळी सतीश सुरवसे,प.स.सुवर्णा भालेराव, शिवानंद सुरवसे,सिद्धार्थ सुरवसे,सचिन माने, हजर होते.तदनंतर.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे,रिपाइंचे तालुका अध्यक्ष सुभाष सोनकांबळे, जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय शिंदे,पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.किरण सगर, अॅड.मल्हारी बनसोडे, अॅड. हिराजी पांढरे, गुनरत्न भालेराव, धीरज बेळंबकर,मंडल अधिकारी जयंत गायकवाड, कमलाकर सूर्यवंशी, डी.टी.कांबळे,पंचायत समितीचे सदस्य वामन डावरे, प्रा एम.टी सूर्यवंशी यांनी अभिवादन केले.

 
Top