कळंब/प्रतिनिधी-
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार शिक्षक नेते शिवाजीराव पाटील यांना  शिक्षक भवन कळंब येथे महारष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिवाजीराव पाटील (90) यांचे येलुर ता. वाळवा जि.सांगली येथे रविवार  दिर्घ आजाराने निधन झाले. श्रद्धांजली अर्पण करताना शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे म्हणाले की, शिवाजीराव पाटील यांनी शिक्षक चळवळी साठी जवळपास 60 वर्षे योगदान दिले दिले आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षक व शिक्षणासाठी त्यांनी शेवट पर्यंत कार्य केले त्यांचे योगदान राज्यातील शिक्षक कधीही विसरु शकणार नाही प्राथमिक शिक्षक असताना ही त्यांना विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली या काळात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटीवला.
 यावेळी जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री विठ्ठल माने,बाबासाहेब कल्याणकर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार, चिटणीस राजेंद्र बिक्कड, प्रदिप रोटे, गणेश कोठावळे, संतोष लिमकर, चंद्रकांत शिंदे, शिवराज मेनकुदळे, उत्रेश्वर शिंदे, महादेव खराटे, डी.ओ.पवार ,आण्णासाहेब चौधरी व शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .

 
Top