उमरगा/प्रतिनिधी-
मुस्लिम बांधवांच्या वतीने नागरिक संशोधन बिल व एन आर सी विधयेकच्या विरोधात उमरगा येथे सोमवारी दि.23 रोजी तहसीलदार यांना  मुस्लिम समाजाचे सह्याचे निवेदन देण्यात आले.
सोमवारी दि.23 रोजी उमरगा तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने सकाळी अकराच्या दरम्यान उमरगा तहसीलदार यांना नगरी संशोधन विधेयक व एनआरसी कायद्याच्या विरोधात निवेदन देण्यात आले.
नायब तहसीलदार रोहन काळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,भारत सरकारने जे नागरी शँशोधन विधेयक पारित करून कायदा बनविलेला आहे त्यात पाकिस्तान,अफगाणिस्तान,बांगलादेश या देशातील शरणार्थी अल्पसंख्याक समाजाला नागरिकत्व देण्याची शिफारस केलेली आहे ते संविधानाला अनुसरुन नसून देशात विभाजनाची बीजे रोवली जाणार आहेत.सविधांतील आर्टिकल 14 व 15 नुसार सर्व धर्मियांना समानता देण्यात आली आहे.त्याला धोका निर्माण झालेला आहे.तसेच एन आर सी नियमामुळे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जे नियम लावण्यात येणार आहेत त्याचा मोठा फटका गरीब,अशिक्षित वर्गाला बसणार असून देशात यामुळे प्रचंड असंतोष असून हे दोन्ही कायदे तात्काळ रद्द करावेत असे निवेदनात म्हटले आहे. *निवेदन दिल्यानंतर मुस्लिम बांधवांनी  राष्ट्रगीत म्हणून आंदोलनाची सांगता केली.* यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष बाबा औटी, माझी नगराध्यक्ष रजाक अत्तार, प्रा शौकत पटेल, बाबा जाफरी, खाजा मुजावर, भैय्या शेख, आयुब मुजावर,कलीम पठाण, निजाम व्हणताळे, मौलाना आयुब, मौलाना सगीर, मौलाना गुलामनबी,हाफिज युसूफ, हाफिज अमजद, हाफिज समीर, हाफिज राशीद, जफर पठाण जाहेद मुल्ला, आदम औटी, मशाक शेख, याकूब लदाफ, शौकत औटी व इतर मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक माधवराव गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
 
Top