उस्मानाबाद/प्रतिनिधी-
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उस्मानाबाद व तुळजापूर शहरातून रॅली काढण्यात आली.  उस्मानाबाद शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी , विश्व हिंदू परिषद , राष्ट्रसेविका समिती , किसान संघ , मजदूर संघ , भटके-विमुक्त विकास परिषद , शिवराज्याभिषेक सोहळा समिती , भारत माता मंदिर प्रकल्प यांच्यासह 45 सामाजिक संस्था संघटनांनी एकत्र येऊन रॅली काढली होती. हा कायदा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही,  नागरिकता सुधारणा कायदा सर्व भारतीयांच्या सन्मानासाठी , संविधानाच्या विरोधात नाही , असे जनजागृती फलक हातात घेऊन निघालेली ही रॅली  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. त्यांनतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधुन भाजपामध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी मोर्चामध्ये दिसून आले नाहीत.
जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या म्हटले आहे की, ह्या कायद्याला आमचे  समर्थन असून देशभरात लवकरात लवकर ह्या कायद्याची अंमलबजावणी करावी, या कायद्याबद्दल जनतेत संभ्रम गैरसमज पसरवून अशांतता निर्माण करणा-यावर कठोर कारवाई करावी , अशा मागण्या करण्यात आल्या. रॅलीमध्ये भारतीय पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता  कुलकर्णी , भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड.मिलिंद पाटील , भाजपाचे रामदास आण्णा कोळगे, भास्कर बोंदर,  जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य , सरपंच, नगरसेवक , लोकप्रतिनिधी , महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी  यांच्यासह महिला ,  नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अडविण्याचा प्रयत्न
या मोर्चा प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिक-यांची दिव्याची गाडी आल्यानंतर ती गाडी पोलिसांनी दुस-या गेटने घेऊन जाण्यास सांगूनआडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी सतर्कता दाखवून  पोलिसांना ती सरकारी गाडी आहे, सोडा असे आदेश दिले. तर दुस-या एका प्रसंगी ज्येष्ठ महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी बंद असलेल्या गेटजवळ येत असताना पोलिसांनी दुस-या गेटने जाण्यास सांगितले. याही वेळी उपविभागीय पुलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी मानुसकी दाखवत पोलिसांना गेट उघडून त्या महिलेस गेट मध्ये प्रवेश देण्याची सूचना दिली.एकदर  मोर्चा मोठा नसताना ही पोलिसांनी आपल्या खाकीचा रूबाब दाखविल्याचे बोलले जात होते.
तुलजापूरात तहसीलदारांना निवेदन
तुळजापूरात शहरात रॅली काढून  नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात  तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ऋषीकेश साळुंके, अलोक शिंदे, पवार भारतीय जनता पार्टीचे नेते अनिल काळे, गुलचंद व्यवहारे, विकास मलबा, नारायण नन्नवरे, नागेश नाईक , सुहास साळुंके , संजय खुरुद, सचिन ताकमोघे, गुरुनाथ बडूरे आदींसह अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत.
 
Top